आई घराचं मांगल्य असते तर वडील घराचं अस्तित्व असतात.
वडिलांना महत्त्व असूनही व्याख्याता आई विषयी बोलत राहतो.
वडिलांविषयी जास्त कोठेही लिहिलं जात नाही.
संत महात्म्यांनी आईचंच महत्त्व अधिक सांगितलेलं आहे.
देवादिकांनी आईचेच गोडवे गायलेले आहेत.
चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते. पण वडिलांविषयी कुठेच फारसं बोललं जात नाही.
काही लोकांनी वडील रेखाटले पण तेही तापट, व्यसनी, मारझोड करणारेच !
समाजात एक-दोन टक्के असे वडील असतीलही, पण चांगल्या वडिलांबद्दल काय ?
आईकडे अश्रुंचे पाट असतात पण बापाकडे संयमाचे घाट असतात.
आई रडून मोकळी होते. पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं आणि रडण्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडतो.
आयुष्याची शिदोरी करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो !
आई रडते. वडिलांना रडता येत नाही.
जिजाबाईंनी शिवाजी घडवला असं अवश्य म्हणावं. पण त्याच वेळी शहाजी राजांची ओढाताणही ध्यानात घ्यावी. देवकी व यशोदेचं कौतुक करावं. पण पुरातून पोराला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव सुद्धा लक्षात ठेवावा.
राम कौसल्येचा पुत्र असला तरीही पुत्र वियोगाने मरण पावलेला पिता दशरथ होता.
कोणालाही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते. कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते.
पण गुपचुप पेढ्याचा पुडा आणणारा बाप कोणालाच लक्षात रहात नाही.
चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर 'आई गं' हा शब्द बाहेर पडतो पण रस्ता पार करताना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक लावतो तेव्हा 'बाप रे' हाच शब्द बाहेर पडतो.
छोट्या संकटकाळी आई चालते पण मोठमोठी वादळं पेलताना बापच आठवतो !!
आई असते अश्रुंचे पाट, पण बाप सयंमाचा घाट.
आई देते रडन्याला वाट, बापावर मात्र तनावाची लाट !
आई असते जळनारी ज्योत, पण बाप ज्योतिसाठी समई,
ज्योत विझून थंड रहाते, ज्योतिसाठी समई स्वता तापते !
रोजच्या जेवणाची सोय करते आई, पण बापाला आयुष्याच्या शिदोरिची घाई आई रडते बापाला रडता येत नाहीत्याच, दुःख त्याच्या शरिराताच राही,
स्वताची आई मेली तरी रडायच नाही कारण बहिणीचा मग तो आधार होई.
स्वताचा बाप मेला तरी रडायच नाही कारण छोट्या भावंडात जिव अडकून राही,
जन्माला आल की मुलाच्या आईच खुप कौतुक होत पण होस्पिटलच्या बाहेर अस्वस्थ बापाकड़े कोण पाहत ?
कधी अचानक पत्नी पण अर्ध्यावर सोडून जाई तरी सुधा डोळ्यातून अश्रूंचा थेम्ब नाही !
कारण पोटच्या पोराना सांभाळायच असत अश्रुना आवर घालून सगळ सावरायाच असत, त्याला फ़क्त झिझायच एवढच माहित असत जबाबदारीच ओझच आता वहायच असत !
मुलीला गावुन ,मुलाला लुंगी ,स्वताला मात्र कापड जुनफटकी बनियान, त्याला पडलेली भोक दाढीला नाही साबण.
पोरिच लग्न ,पोराच शिक्षण , दुसर उत्पन्नाच साधन नसत मुलाच्या इंजीनियरिंग प्रवेशासाठी त्याच पायतान झिझत,
बाप सर्वांसाठी सर्व करूनही तो कणखरपणे उभा असतो.....
पण त्याचा दिवस आता मावळतीकड़े झुकलेला असतो..!!
[[ हा लेख... माझा नाही... मला मित्राकडून मिळाला..... त्या लेखकाचे आभार करण्यासाठी मी त्याला ब्लॉग वर लिहिला आहे. ]]
